तिसगावचे व्यापारी महसूलमंत्री थोरात यांच्या भेटीला

जागा संपादित न करण्याची केली मागणी
तिसगावचे व्यापारी महसूलमंत्री थोरात यांच्या भेटीला

तिसगाव |वार्ताहर| Tisgav

कल्याण विशाखापट्टणम (Kalyan Visakhapatnam) क्रमांक 61 या राष्ट्रीय महामार्गावरील (National Highways) तिसगाव (Tisgav) येथील गुरुवार पेठेतील दुकान मिळकती व इतर घर मिळकतीच्या जागा रस्ता रुंदीकरणासाठी संपादित न करण्यासाठी गावच्या व्यापार्‍यांसह ग्रामस्थांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांची भेट घेऊन निवेदन दिले.

तिसगावचे (Tisgav) उपसरपंच इलियास शेख, काँग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष नासिरभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी महसूल विभागाकडून (Department of Revenue) झालेल्या सर्वेबाबत हरकती घेतल्या. तसेच गुरुवार पेठेतील संपादित करावयाच्या दुकान मिळकतीवर व्यवसायावर कुटुंब अवलंबून आहे. परंतु चुकीच्या झालेल्या प्रक्रियेमुळे आमच्या कुटुंबाचा जीवन-मरणाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. दुकान मिळकतीवर वडिलोपार्जित पिढ्यानं पिढ्यापासूनचा व्यवसाय सुरू आहे.

आमच्या दुकान मिळकतीची जागा या रस्त्यासाठी संपादन झाल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन आमचे कुटुंब रस्त्यावर येईल. त्यामुळे शासनाला कोणत्याही परिस्थितीत आमच्या दुकान मिळकती हस्तांतरित करायच्या नाहीत. तसेच शासनाचा मोबदला देखील घ्यायचा नाही, असे स्पष्ट करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पापाभाई तांबोळी, आरीफ तांबोळी, अ‍ॅड अय्याज इनामदार, कदीर पठाण वसिम सय्यद, सिकंदर पठाण, बाळासाहेब हरिभाऊ थोरात, राजीव कटारीया, चंद्रकांत भावसार, फिरोज तांबोळी, समीर पठाण, जावेद सय्यद, बाबा पुढारी,खाजाभाई शेख, नजीर पठाण, दिलावर पठाण, मोईम पठाण आदी उपस्थित होते.

या रस्त्याच्या प्रकरणात मी स्वतः लक्ष घालून कोणावरही अन्याय होणार नाही. यामध्ये समन्वयाने योग्य तो मार्ग काढू , असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिष्टमंडळाला दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com