तिसगाव बाजार समितीत कांद्याला 50 पैसे किलो भाव

संतप्त शेतकर्‍यांनी बाजार समितीच्या प्रवेद्वारावर केली कांद्याची होळी
तिसगाव बाजार समितीत कांद्याला 50 पैसे किलो भाव

करंजी |प्रतिनिधी| Karanji

तिसगाव बाजार समितीत (Tisgav Market Committee) दिवसभर व्यापारीच फिरकले नाहीत. तसेच तीन दिवसांपासून कांद्याला (Onion) चक्क पन्नास पैसे व एक रुपया किलो प्रमाणे भाव दिला गेल्याचे निदर्शनास येताच संतप्त कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी (Onion Grower Farmer) तिसगाव उपबाजार समितीच्या प्रवेशद्वारातच कांद्याची होळी करून आपला संताप (Anger) व्यक्त केला.

तिसगाव बाजार समितीत कांद्याला 50 पैसे किलो भाव
राळेगणसिद्धी खून प्रकरणातील संशयिताच्या आवळल्या मुसक्या

गेल्या काही दिवसापासून कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या (Onion Grower Farmer) कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांचा पिकाचा खर्चही (Crops Expenses) वसुल होत नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशातच मंगळवारी तिसगाव उपबाजार समितीमध्ये अनेक शेतकरी कांदा (Onion) घेऊन आले परंतु दुपारी तीन वाजेपर्यंत उपबाजार समितीमध्ये एकही कांदा व्यापारी उपस्थित नसल्यामुळे दिवसभर कांदा उत्पादक (Onion Grower) शेतकर्‍यांना या ठिकाणी थांबून राहण्याची वेळ आली.

तिसगाव बाजार समितीत कांद्याला 50 पैसे किलो भाव
या तालुक्यातील महिला मंडलाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

तसेच गेली तीन ते चार दिवसांपूर्वी कांद्याला 50 पैसे व एक रुपया किलो प्रमाणे भाव मिळाल्याचे देखील काही उपस्थित शेतकर्‍यांनी सांगितल्याने शेतकर्‍यांचा पारा आणखीनच चढला. कांद्याला (Onion) भाव मिळत नसल्याने कांद्याच्या गोण्या ट्रॅक्टर जीप मधून उप बाजार समितीच्या प्रवेशद्वारा पुढे टाकून या कांद्यावर अक्षरशा पेट्रोल (Petrol) टाकून पेटवून देण्यात आले. भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी कांद्याची होळी केल्याने उपस्थितांनी देखील मोठी हळहळ व्यक्त केली. यावेळी शेतकरी अनिल वाघमारे, सुनिल लवांडे,लियाकत शेख, संदीप आव्हाड, अर्षद शेख यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

तिसगाव बाजार समितीत कांद्याला 50 पैसे किलो भाव
'त्या' योजनेतून वगळलेल्या शेतकर्‍यांना 5975 कोटी रुपये देण्याचे ‘उच्च’चे आदेश

तिसगाव बाजार समितीत (Tisgav Market Committee) कोणाचीही अडवणूक होणार नाही. तसेच व्यापार्‍यानी देखील शेतकर्‍यांची आडवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचाही परवाना रद्द करू. असा इशारा चेअरमन सुभाषराव बर्डे, संचालक वैभव खलाटे, शेषराव कचरे, अरुण रायकर, जिजाबापु लोंढे या संचालकांनी यावेळी दिला.  

तिसगाव बाजार समितीत कांद्याला 50 पैसे किलो भाव
लवकरच 205 मुख्याध्यापक, विस्तार अधिकार्‍यांना पदोन्नती

व्यापार्‍यांचे परवाने रद्द करा

सकाळी आठ वाजल्यापासून तिसगाव उपबाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणलेला आहे परंतु या ठिकाणी एकही व्यापारी उपलब्ध नसल्याने कांद्याचा निलाव कोण करणार एकतर कांद्याला भाव मिळत नाही दुसरीकडे कांदा व्यापारी उपस्थित नाहीत त्यामुळे शेतकर्‍यांची चेष्टा करणार्‍या येथील कांदा व्यापार्‍यांचा परवाना रद्द करावा अशी मागणी शेतकरी विष्णू गायकवाड यांनी केली आहे.

तिसगाव बाजार समितीत कांद्याला 50 पैसे किलो भाव
‘अमृत’बाबतच्या पदाधिकार्‍यांच्या घोषणा हवेत

तिसगाव बाजार समितीमधे अठरा कांद्याच्या गोण्या विक्रीसाठी आणल्या होत्या. या 18 गोण्यांची चारशे रुपये पट्टी आली म्हणून बायकोला फोन केला. चारशे रुपये कांद्याची पट्टी येत आहे. काय करु? असं तीला विचाल, तर बायकोने संतापून सांगितलं द्या पेटून तिकडं. म्हणून मीपण वैतागून बाजार समितीच्या गेटवरच कांदा पेटवून दिला.

- मनोज ससाने शेतकरी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com