तिसगावमध्ये विजेचा खेळखंडोबा

तिसगावमध्ये विजेचा खेळखंडोबा

करंजी |प्रतिनिधी| Karanji

पाथर्डी तालुक्यातील बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या तिसगाव येथे गेल्या आठ पंधरा दिवसांपासून वीज पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड होत असून विजेचा खेळखंडोबा झाला आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. अचानकपणे अधिक दाबाने वीजपुरवठा झाला तर वीज ग्राहकांच्या घरातील अथवा दुकानातील अनेक इलेक्ट्रिक वस्तू खराब होऊन मोठे नुकसान होत आहे. सातत्याने वीजपुरवठा देखील खंडित होत आहे.

याबाबत ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी यांनी सुरळीत वीजपुरवठा मिळावा तसेच अचानकपणे पूर्ण दाबाने वीज पुरवठा झाला तर इलेक्ट्रिक वस्तूंचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे महावितरणने ग्राहकांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान न होता सुरळीतपणे वीजपुरवठा सुरू ठेवावा.

वीज कर्मचार्‍यांकडे विजेसंदर्भातली अनेक साधन सामग्री नसल्यामुळे अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणी येत असल्याचे वीज कर्मचार्‍यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे वीजग्राहकांना आणखी आर्थिक संकटात टाकण्याचे काम महावितरणने करू नये व विजेचा तांत्रिक बिघाड दुरुस्त करून चांगली सेवा ग्राहकांना देण्याचे आवाहन सदस्य परदेशी यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com