तिसगावात भरदुपारी घरफोडी

शिक्षकाच्या घरातून सव्वा लाखाचा ऐवज लंपास
तिसगावात भरदुपारी घरफोडी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील तिसगाव येथे भर दुपारी माजी शिक्षकाच्या घराचे कुलूप तोडून एक लाख बारा हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी घडली.

याबाबत नंदकुमार सिताराम गाडगे (रा. माधवनगर, तिसगाव ता.पाथर्डी) यांच्या तक्रारीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार रविवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास गाडगे पत्नी बरोबर जोडमोहोज येथे कार्यक्रमाला गेले होते. तर त्यांचा मुलगा आदित्य कामानिमीत्त करंजी येथे गेला होता. त्यामुळे घराला कुलूप लावलेले होते.

आदित्य दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरी आला तेव्हा त्याला घराचे कुलूप तोडून कोंड्याला लटकवलेले दिसले. चोरट्याने बेडरूम मधील कपाटातील उचकापाच करून एक लाख बारा हजार पाचशे रुपयाचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. गाडगे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक कौशल्यरामनिरंजन वाघ तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com