तीन दिवसांसाठी नगरमधून 12 जणांना केले हद्दपार

टिपू सुलतान जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्याच्या होते तयारीत
तीन दिवसांसाठी नगरमधून 12 जणांना केले हद्दपार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात टिपू सुलतान जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्याच्या तयारीत असलेल्या 12 जणांना तीन दिवसांसाठी नगर शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. कोतवाली पोलिसांच्या प्रस्तावानुसार उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी ही कारवाई केली आहे.

शाह फैसल बुर्‍हाण सय्यद, सरफराज इब्राहीम शेख, कासिम इब्राहीम शेख, तैजीब आरीफ शेख, सलमान मोहम्मद मुश्ताक शेख, अशरफ नफीस अहमद शेख, अजीम नुरमोहम्मद राजे, नईम सरदार शेख, शरीफउद्दीन सय्यद, अल्तमश सलीम शेख ऊर्फ जरीवाला, आबिद हुसेन मोहम्मद हनीफ शेख, शाहबाज उर्फ बॉक्सर इक्बाल शेख या बारा जणांना हद्दपार करण्यात आले आहे. आज (रविवारी) टिपू सुलतान जयंतीनिमित्त नगर शहरातून मिरवणूक काढण्याची तयारी सुरू आहे.

पोलिस प्रशासनाने मिरवणुकीला परवानगी नाकारली आहे. त्यानंतरही मिरवणूक काढण्याची शक्यता असल्याने व यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कोतवाली पोलिसांनी 12 जणांवर सीआरपीसी कलम 144(2) अन्वये कारवाईचा प्रस्ताव दिला होता. उपविभागीय दंडाधिर्‍यांनी या 12 जणांना 19 ते 21 नोव्हेंबर या तीन दिवसांसाठी नगर शहरातील कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी, भिंगार कॅम्प, नगर तालुका व सुपा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून हद्दपार केले आहे. कोतवाली पोलिसांमार्फत या आदेशाची बजावणी करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com