करोनामुळे सुशिक्षित तरुणावर भाजीपाला विकण्याची वेळ

करोनामुळे सुशिक्षित  तरुणावर भाजीपाला विकण्याची वेळ

वळण (वार्ताहर)

राहुरी तालुक्यातील पूर्वभागातील तरुण सुशिक्षित दीपक अण्णासाहेब चव्हाण हा तरुण आयटीआय व बारावी सायन्स शिकलेला विद्यार्थी आहे. तसेच त्याचे आई-वडील शेती करतात व शेतामध्ये भाजीपाला पिकवितात.

या तरुणाने न डगमगता करोना महामारी रोगात मार्केट कमिटी बंद असल्यामुळे आई-वडिलांनी पिकविलेला भाजीपाला करायचा काय? याचा विचार करून डिस्टन्स पाळून भाजीपाला रोडवर घेऊन विकण्यास सुरुवात केली आहे.

या तरुणाचं राहुरी तालुक्याच्या पूर्वभागामध्ये कौतुक होत आहे. हा तरुण नोकरीस होता. त्याची नोकरीही गेली. पण त्याने आई-वडिलांना मदतच करायची ठरविली. बाभळीच्या झाडाखाली एक तास भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायाला चांगल्यापैकी प्रतिसाद मिळत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com