बाजारभाव नसल्याने फुले रस्त्यावर फेकण्याची शेतकर्‍यांवर वेळ

ऐन सनांच्या काळात मागणीच नसल्याने शेतकरी, व्यापारी हवालदिल
बाजारभाव नसल्याने फुले रस्त्यावर फेकण्याची शेतकर्‍यांवर वेळ

पारनेर |तालुका प्रतिनिधी|Parner

गणपती स्थापना (Ganpati establishment) होऊन आर्धे दिवस संपले तर गौरी (महालक्ष्मींना) निरोपही दिला परंतु फुलांना मागणीच नसल्याने बाजारभाव (Market Price) गडगडले आहेत. ग्राहकच नसल्याने फुले फेकून देण्याची वेळ शेतकरी (Farmers) व व्यापार्‍यावर (Traders) आली आहे.

श्रावणातील व्रत वैकल्यानंतर गणपती उत्सव व त्यापुढील सणासुदीच्या उत्सवात दोन पैसे मिळून देणारे पिक म्हणून पारनेरसह जिल्ह्यातील अनेक शेतकरी फुलशेती करतात. यात शेंवती (Shevanti), झेंडू (Marigold), अष्टर, चांदणी (Awning), गुलछडी, गुलाब (Rose) या फुलांना या कालावधीत चांगली मागणी असते. पारनेर (Parner) व अहमदनगर (Ahmednagar) ही फुलांची मोठी बाजारपेठ (Market) आहे. येथुन देशभर फुले पाठवली जातात परंतु करोना मुळे सण उत्सवावर बंदी आहे. तर ऐन गणेश उत्सवात मागणी (Demand) नसल्यामुळे मातीमोल भावाने फुले विकली जात आहेत. तर कधीकधी ग्राहक नसल्यामुळे मजुर लावून तोडलेली फुले फेकून द्यावी लागत आहेत .

ऐन सनासुदीत फुलाना बाजार नसल्याने शेतकरी मोठ्या आडचणीत सापडला आहे ऊन्हाळाभर भरलेले पाणी लागवड.खुरपती बियाने खुरपनी खते औषधे यावर केलेला खर्चही भरून निघने अवघड झाले आहे. जिथे शेंवती (Shevanti). झेंडू आष्टर गुलझडी आदी फुलाना सत्तर ते शंभर रुपये दर आपेक्षीत आसताना आज रोजी दहा ते पंधरा रुपये दर मिळत आहे. करोना मुळे गणेश उत्सवावर बंधने आहेत मोठाली मंडळानी सजावट नसल्यामुळे फ्लावर डेंकोरेशन फुलमाळाची गालीच्याची सजावटच नाही .त्यामुळे फुलाना उठाव नाही ऐकूनच दर गडगडले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांसह व्यापारीही आडचणीत सापडले आहेत .

मजुर लावून तोडलेल्या फुलाना बाजारात उठावही नाही आणि दर ही नाही आणि इकडे फड खराब होऊ नहे म्हणून मजुर लावून फुले तोडून फेकुन द्यावे लागत आहे . तर राज्याबाहेर विक्रीला नेलेली फुलेही ग्राहंक नसल्यामुळे खर्ची घालून फेकून द्यावी लागत आहेत . अशा चौहबाजुने शेतकरी काञीत सापडला आहे .

- शशीकांत झंजाड, शेतकरी चिंचोली ता.पारनेर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com