तिळापुर सोसायटीचे 22 सभासदांवर अपात्रतेची कारवाई

'हे' आहे कारण वाचा
तिळापुर सोसायटीचे 22 सभासदांवर अपात्रतेची कारवाई

आरडगांव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यामध्ये (Rahuri Taluka) नुकत्याच सहकारी सोसायटीच्या निवडणुका (Elections of Cooperative Societies) पार पडल्या आहेत. बहुतेक ठिकाणी विविध मुद्यांवरून राजकीय संघर्ष बघायला मिळाला. त्यात खुडसरगाव (Khudsargav) येथे एका तक्रारीवरून 11 सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यात (Cancellation of Membership of Members) आले होते. आता त्यापाठोपाठच तिळापुर सोसायटीत (Tilapur Society) देखील 22 सभासदांवर अपात्रतेची कारवाई झाल्याने सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडालीय आहे. सहाय्यक निबंधक दिपक नागरगोजे यांनी तशा आशयाचे आदेश काढले आहेत. अपात्र झालेल्या सभासदांनी नुकत्याच झालेल्या सोसायटी निवडणुकीत मतदान (Voting in Society Elections) केल्यामुळे सदर मतदान प्रक्रिया देखील रद्द करावी अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. आता या कारवाईमुळे सहकार विभाग पुढे काय कारवाई करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

तिळापुर सोसायटीचे 22 सभासदांवर अपात्रतेची कारवाई
श्रीक्षेत्र ताहाराबादला जमला वैष्णवांचा मेळा

अण्णासाहेब रामदास जाधव, नामदेव शंकर गरदरे, वामन ओंकार जाधव सर्व राहणार तिळापुर ता.राहुरी यांनी 25 मे 2022 रोजी बोगस सभासद व निवडून आलेले संचालक हे बेकायदेशीर आहेत. तसेच संस्थेचे सचिव यांनी देखील चुकीचे काम केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची करण्याची लेखी तक्रार सहाय्यक निबंधक दिपक नागरगोजे यांच्याकडे केली होती. तक्रार अर्जात म्हटले होते की, सन 2022 रोजी झालेल्या तिळापुर सोसायटीचे संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुक दरम्यान काही सभासदांवर हरकती घेतल्या होत्या. मात्र त्यावेळी या बोगस सभासदांवर कारवाई झाली नाही. आणि त्यांनी देखील या मतदान प्रक्रियेत मतदान केले. आता मात्र त्यांना अपात्र केलेला आहे. त्यामुळे लोकशाही पद्धतीने घेण्यात आलेली निवडणूक ही पुन्हा रद्द करण्यात यावी अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.

तिळापुर सोसायटीचे 22 सभासदांवर अपात्रतेची कारवाई
विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू

सदर सभासद हे संचालक मंडळाच्या ठरावाच्या नियमानुसार सभासद झालेली आहेत. तथापि यासंदर्भाने त्यांना सभासद केल्याबाबत संस्थेचा ठराव सभासद अर्ज प्रवेश फी शेअर्स फी इत्यादी बाबी सादर करू शकले नाहीत. तथापि अर्हता दिनांकाच्या संदर्भाने नजरचुकीने त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट झाल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे 22 सभासद हे बोगस असल्याचे निदर्शनात आल्याचे पत्रात नमूद केले आहे.

तिळापुर सोसायटीचे 22 सभासदांवर अपात्रतेची कारवाई
शेकडो पायी दिंड्यांचे नेवाशात आगमन

तसेच संस्थेच्या लेखापरीक्षण अहवाल सन 2019-20 मध्ये नावे असताना देखील 11 सभासदांच्या पात्र मतदार यादीमध्ये नावे समाविष्ट न केल्यामुळे 11 सभासद मतदानापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क असूनही मतदान करता आले नाही. हेही स्पष्ट झाले आहे. गट सचिव यांची निष्काळजीपणा केल्याचे दिसून येत असल्याचे सहाय्यक निबंधक यांच्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे यावर काय कारवाई होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com