टिळकनगर-हनुमानवाडी रस्त्याची दुर्दशा

रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी
टिळकनगर-हनुमानवाडी रस्त्याची दुर्दशा

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

टिळकनगर कारखान्यापासून ते हनुमानवाडीपर्यंत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आपला जीव मुठीत ठेवून प्रवास करण्याची वेळ आली आहे. नागरिकांच्या होणार्‍या उद्रेकाअगोदर या कारखाना व्यवस्थापनाने रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

एकलहरे ग्रामपंचायतकडून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी लेखी कळविले असताना त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे. काही दिवसांपूर्वी टिळकनगर कारखान्याकडून या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम मुरूम टाकून केले गेले. त्यानंतरही रस्त्याची दुरवस्था कमी झाली नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात दुचाकीस्वारांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. दुचाकी या रस्त्यावरून घसरून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस झाल्यावर या रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी साचत आहे.

सुमारे अर्धा किलोमीटर पर्यंत ही अवस्था असल्याने दुचाकीस्वारांना मोठी कसरत होत असून तिव्र संतापाची भावना व्यक्त होताना दिसत आहे. या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठली व्यवस्था नाही. रस्त्यावरून कामगार वर्ग विशेषतः महिला कामगारांसह ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शेती माल वाहतूक करणारे व अन्य प्रवासी यांची मोठी वर्दळ असल्याने यासंदर्भात तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी एकलहरे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अन्सारभाई जहागीरदार, पत्रकार लालमोहमद जहागीरदार, सामाजिक कार्यकर्ते विलासराव ठोंबरे, सरपंच रिजवाना अनिस शेख, सदस्या नसीमखातून जहागीरदार, अनुसया इंगळे, कोकिळा अग्रवाल, निर्मला झिने, पूजा चौधरी, रावण भागा निकम, आशा अनिल कांबळे, अनिस शेख, माजी सरपंच संजय अग्रवाल, बबन झिने, रंगनाथ जाधव, देविदास चौधरी, गणेश उमाप, पुंजा तुपे, साहेबराव भोसले, हसन शेख, शकील शेख, प्रकाश सोनवणे, विकी पारखे, राहुल दाभाडे, सतीश दाभाडे, अनिल सुरडकर, सतीश सोनवणे, अमोल त्रिभुवन, राजू हिवराळे, समीर शेख, प्रवीण मिसाळ, गणेश शेळके, नितीन गडवे, जॉनी मंतोडे, रवी बैरागी, राजू गायकवाड, सुरेश जाधव, राहुल खंदारे, विलास जाधव, श्रीधर सोनवणे, जावेद शेख, तुळशीराम हेलिंगे, अविनाश जाधव, अजय सोनवणे, राजू झिने, गोपाल शिरसाठ, गणेश अंभोरे आदींनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com