टिळकनगर येथून 150 किलो गोमांस पोलिसांनी पकडले; गुन्हा दाखल

टिळकनगर येथून 150 किलो गोमांस पोलिसांनी पकडले; गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहराजवळील टिळकनगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागील बाजुस असलेल्या कॉलनीत मटनाचे दुकानात बेकायदेशीर कत्तल करुन त्याचे गोमांस करत असताना पोलिसांनी पकडले. पोलिसांनी या आरोपीकडून सुमारे 21 हजार रुपये किंमतीचे 150 किलो गोमांस पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिळकनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागील बाजुस असलेल्या कॉलनील बेकायदेशीररित्या गोमांस विकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कोते यांना बरोबर घेवून दि. 30 ऑक्टोबर रोजी 12 च्या सुमारास टिळकनगर परिसरात डॉ. आंबेडकर स्मारकाच्या पाठीमागच्या बाजूला पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी आरोपी फिरोज मुसा कुरेशी (वय 45), रा. वार्ड नं. 2, काझीबाबारोड, श्रीरामपूर यास ताब्यात घेवून त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे 21 हजार रू. किंमतीचे जनावरांचे 150कि. गोमांस विनापरवाना बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात यांनी फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 979/2022 प्रमाणे फिरोज कुरेशी याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5, 5अ, ब, 9अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक श्री. राशिनकर हे करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, साईनाथ राशिनकर, मच्छिंद्र शेलार, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात या पोलीस पथकाने कारवाई केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com