व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून लुटणारा जेरबंद

नगर तालुका पोलिसांची कामगिरी
व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून लुटणारा जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

हॉटेल व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्याकडील एक लाख 67 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटणार्‍या आरोपीला नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. सुधीर बाबासाहेब सायंबर (वय 30 रा. पारोडी ता. आष्टी, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

नगर तालुक्यातील हातवळण ते रूईछत्तीशी रोडवरील रूईछत्तीशी शिवारात ही घटना घडली होती. सहा जणांनी व्यावसायिक रघुनाथ एकनाथ मेटे (वय 50 रा. नगर - दौंड हायवे, हनुमाननगर, अहमदनगर) यांना लुटले होते. मेटे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तलवारीचा धाकवून लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.

मेटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, पोलीस अंमलदार घोरपडे, भालसिंग, साठे यांच्या पथकाने आरोपी सुधीर सायंबर याला अटक केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com