थरार : बिबट्यावर खुर्ची फेकून मातेने चिमुकलीला वाचवले

थरार : बिबट्यावर खुर्ची फेकून मातेने चिमुकलीला वाचवले

भंडारदरा (वार्ताहर) -

बिबट्या आपल्या पोटच्या गोळ्याची शिकार करणार असल्याचे लक्षात येताच मातेनं प्रसंगावधान राखून सर्व ताकद एकवटून त्याच्या

अंगावर जोराने खुर्ची फेकून मुलीचा जीव वाचवल्याची थरारक घटना भंडारदरा येथे घडली. या महिलेच्या धाडसाबद्दल कौतुक होत आहे.

सूर्य मावळतीला गेला नी सौ. रंजना सुनील भांगरे ही आदिवासी महिला आपल्या घरात आपल्या दोन वर्षाच्या धनश्री मुलीला घेऊन टीव्ही पहात होती. टीव्ही वर होम मिनिस्टर पाहात असताना दरवाजा बंद करण्याचा राहून गेला. साडेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांचे काळे कुत्रे पळत आले नी जिवाच्या अंकाताने चूल घरात पळाले त्यावेळी धनश्री दाराच्या समोर असलेल्या खुर्चीत बसलेली होती. रंजनाबाई काय झाले म्हणून दरवाजा जवळ आल्या तर बिबट्या दारात एक पाय व घरात एक पाय टाकून दत्त म्हणून उभा काय करावे तिला सुचेना मात्र त्याला हाकलले नाही तर समोर त्याच्या पुढ्यात धनश्री बिबट्याने तिला पाहिले व जोराचा आवाज करत पुढे दुसरे पाऊल टाकताच तिने सर्व ताकद एकवटून ओरडून बिबट्याला खुर्ची अंगावर फेकत व मुलीला पोटाशी धरून वाचवा म्हणत आजूबाजूला असणार्‍या वस्तीच्या लोकांना बोलवले त्यामुळे बिबट्या बिचकला. त्याने रंजनाचा अवतार पाहून त्याने जंगलात धूम ठोकली. जर त्याला हुस्कले नसते तर त्याने धनश्रीला शिकार केले असती. मात्र आईने आपल्या हातात प्लास्टिक खुर्ची भिरकवत व जोराचा आवाजाने तिने बिबट्याला हुस्कवले व धनश्री व कुत्र्याचे प्राण वाचवले.

घटनेची माहिती मिळताच राजूरचे वनक्षेत्रपाल जयराम गोंदके, विजय भांगरे कळसूबाई अभ्यारण्यचे डी.डी.पडवळ ,अमोल आडे, वनपाल परते,वनरक्षक करवंदे घटनास्थळी पोहचले. त्यांनी तिथे पिंजरा लावून आजूबाजूच्या शेतकर्‍यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.हा बिबट्या मादी जातीचा असून त्याला तीन बछडे असल्याचे चर्चा परिसरातील लोक करत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com