दत्तनगर येथे एकाच घरातील 4 करोनाबाधित
सार्वमत

दत्तनगर येथे एकाच घरातील 4 करोनाबाधित

टिळकनगरचा कारखाना दोन दिवस बंद

Nilesh Jadhav

टिळकनगर | वार्ताहर | Tilaknagar

श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा एकाच घरातील तीन करोना रुग्ण आढळले आहेत. याच घरातील काल सात जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी अजून एकाचा अहवाल करोना पॉझिटीव्ह आला आहे. तर यातील एक जण टिळकनगर कारखाना येथे कामाला असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने कारखाना प्रशासनाने दोन दिवस कामकाज बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे.

करोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींना विलगीकरण करून, टिळकनगर इंडरस्ट्रीजमधील सर्व कामगारांची रॅपिड टेस्ट घेण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी सांगितले.

शुक्रवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना दोन दिवसांपूर्वी शारीरिक व इतर त्रास जाणवू लागल्याने रुग्णालय प्रशासनाने त्यांची करोना चाचणी घेतली होती त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कंपनीच्या ज्या कामगाराला करोना झालेला होता त्या प्लांटसह इतर प्लान्टची निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे तर दत्तनगर ग्रामपंचायतने तात्काळ तत्परतेने संपूर्ण गावांत निर्जंतुकीकरण फवारणी चालू केली आहे.

नागरिकांनी संयम बाळगत करोनाचा प्रकोप टाळण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने ज्या सूचना दिल्या आहेत, त्याचे पालन करावे, असे आवाहन सरपंच सुनील शिरसाठ यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com