टाकळीभान (वार्ताहर) -

टाकळीभान करोनाचा हॉटस्पॉट होत असल्याने वाढत्या करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना म्हणून उपसरपंच कान्होबा खंडागळे यांनी

ग्रामपंचायतीच्या सभागृहात बोलवलेल्या सर्व पक्षिय कार्यकर्त्यांच्या बैठकित करोनाची साखळी तोडण्यासाठी किमान तीन दिवसांचा कडक लाकडाऊन घेण्यावर सर्वपक्षीयांनी शिकामोर्तब केले. त्यामुळे गावात उद्या सोमवारपासून सलग तीन दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे.

टाकळीभान येथे आठ-दहा दिवसात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे. गाव करोनाचा हॉटस्पॉट ठरु पहात असले तरी नियम धाब्यावर बसवून मोकाट फिरणार्यांची संख्या मोठी आहे. व्यावसायीक व ग्राहकही बेफिकिरीने वागत असल्याने करोनाला प्रतिबंध व उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी नुकतेच प्रांताधिकारी आनिल पवार, तहसिलदार प्रशांत पाटील, पो. नि. मधुकर साळवे, गटविकास आधिकारी संजय दिघे यांच्या पथकाने बाजारपेठेत फेरफटका मारत करोनाला प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. त्यानुसार लॉकडाऊन करावे कि नाही? याबाबत सर्व पक्षीयांचे मते जाणून घेण्यासाठी काल बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकित लॉकडाऊन करण्याबाबत आनेक मत मतांतरे झाली. ग्रा. पं. सदस्य मयुर पटारे यांनी चार दिवसांचा कडक लाकडाऊन करण्यात यावा, मास्क न वापरणारांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी सुचना मांडली. एकाएकी लाकडाऊन जाहीर करण्यापेक्षा कडक निर्बंध लावून फरक पडला नाही तर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा, आसे मत माजी सरपंच मंजाबापु थोरात, भाऊसाहेब मगर, राजेंद्र कोकणे, भाजपाचे नारायण काळे यांनी मांडले. जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. कार्लस साठे यांनी, लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले. नवाज शेख यांनी, गर्दीच्या ठिकाणी कडक निर्बंध लादावेत, करोना रुग्णांसाठी सुविधा आपुर्या असल्याने करोना होवू नये यासाठी नागरीकांनी दक्षता घ्यावी. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी करोनाची साखळी तोडण्यासाठी किमान 72 तासाचा लॉकडाऊन घ्यावा, असे मत मांडले.

माजी सरपंच चित्रसेन रणनवरे, नाना रणनवरे, आदींनी चर्चेत भाग घेतला. शेवटी उपसरपंच कान्होबा खंडागळे यांनी सर्वपक्षीयांची मते जाणून घेत सोमवार दि. 5 मार्च ते बुधवार दि. 7 मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, औषधाची दुकाने व दुध डेअरीचे संकलन वगळता इतर सर्व व्यवसाय कडकडीत बंद रहातील. गुरवारी व्यवसाय सुरु होणार आसले तरी सर्व व्यवसायीकांनी करोना चाचणी करुनच व्यवसाय सुरु करावेत. जे व्यापारी चाचणी करणार नाहीत त्यांचे व्यवसाय पुढील सात दिवसासाठी बंद करण्यात येतील. डॉक्टरांनी उपचारासाठी येणार्या रुग्णाची नोंदवहीत नोंद ठेवावी. या काळात व त्यापुढील कालावधीत विना मास्क फिरणारांवर दंडात्मक कारवाई सुरुच राहील, असेही खंडागळे यांनी सांगितले.

यावेळी ज्ञानदेव साळुंके, अध्यक्ष शिवाजी शिंदे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब कोकणे, भाऊसाहेब पवार, अविनाश लोखंडे, बापुराव त्रिभुवन, अबासाहेब रणनवरे, बबलु वाघुले, सागर पटारे, पांडु कोकणे, अप्पासाहेब रणनवरे, नितिन पटारे, विलास दाभाडे, महेंद्र संत, मोहन रणनवरे यासह विविध पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.