कोपरगावमध्ये आढळले तीन करोना बाधित

7 जणांचे अहवाल निगेटिव्ह
कोपरगावमध्ये आढळले तीन करोना बाधित

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी | Kopergaon

कोपरगाव शहरातील काल सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचे स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या 10 अहवालांपैकी 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर 7 अहवाल हे निगेटिव्ह आले आहे.

त्यामध्ये मध्यवस्ती असलेल्या लक्ष्मी नगर मधील 35 वर्षीय महिला, राममंदिर रोड येथील 35 वर्षीय महिला, तर तालुक्यातील सुरेगाव येथील 42 वर्षीय महिला अशा तीन रुग्णांचा यात समावेश असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com