कोपरगावात 11 जण पॉझिटिव्ह
सार्वमत

कोपरगावात 11 जण पॉझिटिव्ह

Nilesh Jadhav

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी | Kopergaon

कोपरगाव शहरात पुन्हा एकदा दुपारी तीन करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर या रुग्णांच्या संपर्कातील 21 व्यक्तींच्या रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात 4 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत. काल दिवसभरात शहरात एकूण 11 रुग्ण बाधित सापडले आहेत.

त्यामध्ये मध्यवस्तीत असलेल्या काले मळा परिसरातील 52 वर्षीय पुरुष व त्यांचा 30 वर्षांचा मुलगा व त्यांच्या संपर्कातील 24,29 व 59 वर्षीय महिला आहे.तर गांधीनगर मधील 52 वर्षीय पुरुष तसेच समतानगरमधील 50 वर्षीय पुरुष असे एकूण सात अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बाधित रुग्ण राहत असलेला परिसर सील केलेला असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

शहरातील करोना रुग्णांच्या संपर्कातील 70 अहवाल तपासणीस पाठवले होते. त्यामध्ये 50 अहवाल नगर येथील जिल्हा रुग्णालयात तर 20 अहवालांची रॅपिड किटद्वारे तपासणी केली.

तालुक्यात 6 निगेटिव्ह झालेल्या रुग्णांना काल घरी सोडण्यात आले आहे. पॉझिटिव्ह रुग्ण राहत असलेला परिसर निर्जंतूक करण्याचे काम पालिकेच्यावतीने करण्यात आले असून सदर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.दरम्यान रात्री उशिरा खाजगी लॅबमध्ये करोना टेस्ट केली असता त्यात तीन पुरुष व एक महिला असे 4 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात निवारा परिसरातील एकाच कुटुंबातील 40 वर्षीय पुरुष, पत्नी (38 वर्षे) तर त्यांची 14 व 9 वर्षाची मुले यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com