कोपरगाव शहरात आढळले तीन करोना बाधित
सार्वमत

कोपरगाव शहरात आढळले तीन करोना बाधित

9 अहवाल निगेटिव्ह

Nilesh Jadhav

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी | Kopergaon

कोपरगाव शहरातील कोर्ट रोड येथील डॉक्टरच्या संपर्कातील 12 अहवाल आज प्राप्त झाले आहे. त्यापैकी 3 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 9 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

यामध्ये डॉक्टरचा मुलगा (34 वर्ष), सून (29 वर्ष) व पत्नी (60वर्ष) यांचा समावेश आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बाधित रुग्ण राहत असलेला परिसर सील केलेला असून त्यांचा संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com