जैनपूर येथे आढळले तीन करोना बाधित
सार्वमत

जैनपूर येथे आढळले तीन करोना बाधित

बधितांचा वाढता आकडा चिंताजनक

Nilesh Jadhav

बेलपिंपळगाव | वार्ताहर | Belpimoalgaon

नेवासा तालुक्यातील जैनपूर येथे आज तीन जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या सात झाली आहे. यामुळे जैनपूरकरांची चिंता वाढली आहे.

गेल्या तीन ते चार दिवसात जैनपूर सारख्या ग्रामीण भागात हा वाढता आकडा डोकेदुखी ठरत आहे. गावाची लोकसंख्या कमी असून गाव लोकवस्तीमध्ये विभागलेले असून देखील रोज करोना बाधितांनाचा आकडा वाढत आहे. गाव आज पासून 6 ऑगस्ट पर्यंत बंद करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com