राहुरी तालुक्यात करोनामुळे दोन जणांचा मृत्यू
सार्वमत

राहुरी तालुक्यात करोनामुळे दोन जणांचा मृत्यू

बळींची संख्या तीन; देवळालीत चारजणांना बाधा

Nilesh Jadhav

राहुरी | प्रतिनिधी | Rahuri

राहुरी तालुक्यात काल गुरूवारी (दि.06) एकूण सहाजणांना करोनाची बाधा झाली. त्यात देवळाली प्रवरा चार तर राहुरी शहरातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे.

दरम्यान, राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील एक महिला व राहुरी शहरातील एकाजणाचा मृत्यू झाल्याने करोनाबाधित झालेल्या एकूण बळींची संख्या तीनवर गेली आहे.

देवळाली प्रवरा येथील प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार नगरपरिषद हद्दीमध्ये पंधरा दिवसांनंतर सर्व अलबेल वाटत असताना काल गुरूवार दि. 6 ऑगष्ट रोजी राजकीय क्षेत्रातील पितापुत्रासह दोन महिला करोनाबाधित आढळून आल्याने आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे.

दरम्यान, देवळाली प्रवरा परिसरातील बाधित रुग्णांची संख्या एकोणीसवर गेली आहे. पैकी पंधरा रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. पुन्हा नवीन करोना रुग्ण आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

देवळाली प्रवरातील त्या दोन व्यक्तीचे स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तपासणीनंतर दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील दोन महिला बाधित आढळून आल्या आहेत.

सर्वांना राहुरी कारखाना येथील श्री विवेकानंद नर्सिगहोममध्ये सुरू करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच संपर्कात आलेल्या व्यक्तींचा तपास सुरू असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अण्णासाहेब मासाळ यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com