
अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar
चार दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या (Dispute) कारणातून चार जणांच्या टोळक्यांनी तिघांना लाकडी दांडके, दगडाने मारहाण (Beating) केली. शनिवारी सायंकाळी बोल्हेगाव (Bolhegav) उपनगरात ही घटना घडली. मारहाणीत (Beating) भैरवनाथ शंकर वाकळे (वय 27 रा. बोल्हेगाव) हे जखमी (Injured) झाले आहेत. तसेच दगडाबाई शंकर वाकळे व दिपाली गणेश वाकळे (रा. बोल्हेगाव) यांना मुकामार लागला आहे.
भैरवनाथ वाकळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) चौघांविरूध्द गुन्हा दाखल (Filed a crime) केला आहे. दिलीप मार्तंड वाकळे, मोहन मार्तंड वाकळे, अभि मोहन वाकळे, सुरेश दिलीप वाकळे (सर्व रा. बोल्हेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मोहन वाकळे व फिर्यादी भैरवनाथ यांचा भाऊ गणेश वाकळे यांचे रंगपंचमीच्या दिवशी किरकोळ कारणातून वाद (Dispute) झाले होते.
याच कारणातून शनिवारी सायंकाळी आरोपींनी फिर्यादी भैरवनाथ यांना शिवीगाळ करून दगडाने मारहाण (Beating) केली. फिर्यादीची आई दगडाबाई, भावाची बायको दिपाली वाकळे या घराकडे पळत असताना त्यांना पाठीत दगडे लागुन मुकामार लागला आहे. तसेच अभि वाकळे याने लाकडी दांडक्याने फिर्यादीला मारहाण (Beating) केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक धिरज अभंग करीत आहेत.