वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू

वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू

टाकळीभान / माळवाडगाव (वार्ताहर)

श्रीरामपूर व वैजापूर तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या शनिदेवगाव येथील अशोक बाळा मेघळे यांच्या घराजवळील शेतात काल दपारी तीन वाजेच्या सुमारास वीज पडून दोन बैल व एक गाय ठार झाले.

मेघळे यांची घरापासून सुमारे अर्धा किलोमीटर मराठी शाळेच्या पाठीमागे शेती आहे. वैजापूर तालुक्यातील देवगाव शिवारात माध्यमिक विद्यालयाशेजारी अशोक बाळा मेघळे यांची वस्ती असून हायस्कूल जवळील लिंबाखाली पावसात तीनही जनावरे पावसात आश्रयास होती. घटनास्थळाजवळच मुलगा गणेश मेघळे पत्र्याचे पढवीत होता. आश्रयास

दिवसभर कोरडे वातावरण होते. दुपारी अचानक बदल होऊन सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट व पाऊस सुरु झाला. पावसातच दुपारी तीन वाजता झाडावर वीज पडून दोन बैल व एक गाय हे मृत्युमुखी पडले. सुदैवाने मानवजिवीत हानी झाली नाही. मेघळे यांना काही दिवसापूर्वी बैलजोडी एका व्यापाऱ्याने पंच्चाहत्तर हजारांना मागितली होती परंतू त्यांनी आपल्या सर्जा राजात असलेल्या प्रेमापोटी नकार दिला होता. या घटनेमुळे मेघळे यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे.

घटनेची खबर वैजापूर तहसिलदार यांना देण्यात आली असून सायंकाळपर्यंत पाऊस सुरूच असल्याने उशीरापर्यंत पंचनामास्थळी महसूल अधिकारी शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी, पोहचले नव्हते. अचानक वादळी वारे अन् मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडली तर ऊस पीके भुईसपाट झाली.

Related Stories

No stories found.