लग्न न केल्यास बदनामीची धमकी; तरुणाविरूध्द गुन्हा

लग्न न केल्यास बदनामीची धमकी; तरुणाविरूध्द गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लग्न न केल्यास बदनामी करण्याची धमकी देत तरुणीचा हात धरून विनयभंग करणार्‍या तरुणाविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल अशोक काटकर (रा. इंद्रानगर, पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुळची पाथर्डी तालुक्यातील व सध्या नगर शहरातील उपनगरात राहत असलेल्या तरुणीने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी तरुणी नगर शहरात खासगी नोकरी करते. बुधवारी रात्री ती घरी जात असताना अमोलने तीला आडविले व हात धरून म्हणाला,‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु माझ्या सोबत लग्न कर, असे म्हणत तिच्यासोबत गैरवर्तन केले. तेव्हा तरुणी त्याला म्हणाली, ‘मला तुझ्याबरोबर लग्न करायचे नाही, माझा हात सोड’, असे म्हणताच अमोलला राग आल्याने त्याने तरुणीला शिवीगाळ करत,‘तु माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी तुझी बदनामी करेन, तुला त्रास देईल’, असे म्हटले. घडलेल्या प्रकारानंतर तरुणीने तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे.

Related Stories

No stories found.