अपंगत्वावर वाईट बोलून शिवीगाळ करत धमकी

एका जणाविरुध्द गुन्हा
अपंगत्वावर वाईट बोलून शिवीगाळ करत धमकी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

यात्रेत पावत्या न फाडता पैसे वसूल करुन चोर्‍या केल्या आहेत. असा आरोप करून शिवीगाळ करत अंपगत्वाबद्दल वाईट साईट बोलून बदनामी करत शिवीगाळ केली. ही घटना तालुक्यातील गोंडेगाव येथे घडली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारचा श्रीरामपूर तालुक्यात पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आधार दिव्यांग संघटनेचे सचिव संदीप बाळासाहेब शेलार (वय 32) हे गोेेंडेगाव ग्रामपंचायतीत लिपिक म्हणून काम करत आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 29 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभा आटोपल्यानंतर मी दप्तर कपाटात ठेवत असताना गावातील अविनाश आण्णासाहेब दिवटे हा मला म्हणाला तुम्ही चोर आहात. तुम्ही यात्रेमध्ये पावत्या न फाडता लोकांकडून पैसे वसुल केलेले असून चोर्‍या केलेल्या आहेत. तुम्ही हरामखोर, भामटे आहे. तुम्ही मला हिशोब द्या, ग्रामपंचायतीमधील काही कर्मचारी हे लंगडे पांगळे तर आहेच तसेच ते डोक्यातही पांगळे आहेत. असे म्हणुन मी यात्रेतील कर वसुलीची व्हिडीओ शुटिंग काढलेली आहे. ती मी गावात व्हायरल करील व व्हाटसअपवर देखील टाकील व तुझी संपुर्ण गावात बदनामी करीन अशी धमकी दिली आहे.

माझा उजवा हात अपघातामध्ये निकामी झाला असलेने मला 52 टक्के दिव्यांग म्हणुन सर्टीफिकेट दिलेले आहे. तरी यातील आरोपी मचकुर याने मला लंगडा पांगळा तर आहेच पण डोक्यात देखील पांगळा आहे. असे म्हणून तुझी गावात बदनामी करील दम दिला आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात संदिप बाळासाहेब शेलार यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 138/2022 प्रमाणे अविनाश अण्णासाहेब दिवटे याचेविरुध्द भादंवि कलम अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम 2016 नुसार 92 (अ)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सतिश गोरे हे करत आहेत.

Related Stories

No stories found.