
नेवासा |प्रतिनिधी| Newasa
धमकी देऊन वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याची घटना नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे घडली असून याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, तेलकुडगाव येथील गोविंद सुखदेव सरोदे हा तीन महिन्यांपूर्वी आमच्या घरात घुसला. त्याने माझे तोंड दाबून माझ्याशी शारीरिक संबंध करून कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध केले.
या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गोविंद सुखदेव सरोदे याच्यावर गुन्हा रजिस्टर नं. 384/2023 भारतीय दंड विधान कलम 376(2)(एन), 366, 506 452 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.