धमकी देत विवाहितेवर अत्याचार

बोल्हेगावच्या तरूणावर तोफखान्यात गुन्हा
धमकी देत विवाहितेवर अत्याचार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

फोटो (Photo) व व्हिडिओ व्हायरल (Video Viral) करण्याची धमकी देत विवाहित महिलेवर अत्याचार (Torture of a married woman) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) मनोज भालचंद्र जाधव (रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे. अहमदनगर शहरातील (Ahmednagar City) एका उपनगरात राहणार्‍या विवाहितेने फिर्याद दिली आहे.

धमकी देत विवाहितेवर अत्याचार
जिल्ह्यातील 7 पालिकांमध्ये प्रशासकराज!

फिर्यादी महिला व मनोज जाधव यांची मैत्री होती. यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ऑक्टोबर 2021 मध्ये मनोज याच्यासोबत फिर्यादी महिला एमआयडीसी येथील साईबन येथे गेल्यानंतर फिर्यादी महिला पाणी पिल्याने तिला झोप आली. यानंतर मनोज याने तिच्यासोबत संबंध केले. ही गोष्ट कोणाला सांगितली तर नवर्‍याला ठार मारण्याची धमकी दिली. तसेच चांदबिबी महाल येथे गेल्यावरही नवर्‍याला ठार मारण्याची धमकी देत मनोज याने फिर्यादी महिलेसोबत संबंध केले. फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केले असल्याचे पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहे.

धमकी देत विवाहितेवर अत्याचार
थर्टी फर्स्टच्या निमित्ताने भंडारदरा परिसरात येणार्‍यांवर राजूर पोलिसांची करडी नजर
धमकी देत विवाहितेवर अत्याचार
नालेगाव, नेप्ती, निंबळक भागातील शेतकर्‍यांचा रेल्वे रुंदीकरणाला विरोध

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com