देवगड येथे किसनगिरी बाबा पुण्यतिथी निमित्ताने हजारो भाविकांनी घेतले दर्शन

देवगड येथे किसनगिरी बाबा पुण्यतिथी निमित्ताने हजारो भाविकांनी घेतले दर्शन

देवगड फाटा | वार्ताहर

नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील महान तपस्वी श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने शुक्रवारी दि.25 मार्च रोजी पहाटे गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते अभिषेक घालून विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी भाविक भक्तांच्या उपस्थितीत पंचदिनात्मक उत्सवाच्या निमित्ताने श्री किसन गिरी विजय ग्रंथाचे पारायण करण्यात आले. यावेळी श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या नामघोषाने देवगडनगरी दुमदुमली होती.

पुण्यतिथी निमित्ताने वेदमंत्राच्या जयघोष करत गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते किसनगिरी बाबांच्या मूर्तीसअभिषेक घालण्यात आला. कीर्तन मंडपात श्री किसनगिरी विजय ग्रंथाचे पारायण गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. हभप गणपत महाराज आहेर, नारायण महाराज ससे, संजय महाराज निथळे यांनी व्यासपीठ चालक म्हणून सेवा दिली. किसनगिरी विजय ग्रंथाच्या पारायणाची सांगता झाल्यानंतर गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते ग्रंथांचे पूजन करण्यात आले.

देवगड येथे बोलताना भास्करगिरी महाराज म्हणाले की, श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांनी आपल्या तपश्चर्येच्या माध्यमातून भगवान दत्तात्रयांना प्रसन्न करून या एकेकाळी निर्जनस्थळ आलेल्या देवगड येथे दत्त पीठ निर्माण केले. भगवान दत्तात्रयांच्या मंदिर निर्मितीसाठी ते वणवण फिरले, कणकण झिजले भक्तांच्या प्रत्येक जिवाच्या कल्याणासाठी त्यांनी येथे कार्य केले. त्यांनी घालवून दिलेल्या शिकवणी नुसारच येथे बाबांचा पुण्यतिथी उत्सव, महाशिवरात्रीचा उत्सव, दत्त जन्म उत्सव गुरू पोर्णिमा उत्सव आदी कार्यक्रम वर्षभर वैभवशाली पद्धतीने भक्तांच्या योगदानातून साजरे केले जातात. सोहळ्या दरम्यान महाविष्णू याग, अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन, भजन, तथा श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे

श्रीसमर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा यांचा 39 वा पुण्यतिथी महोत्सव शुक्रवार दि, 25 मार्च ते 29 मार्च या कालावधीत पुण्यतिथी महोत्सव संपन्न होनार आहे. कार्यक्रमाची सांगता मंगळवार दिनांक 29 मार्च रोजी सकाळी 8 ते 10 ह भ प पूज्य,गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.

देवगड येथे पुण्यतिथी निमित्त सर्व मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. भाविक भक्त आज पहात पासून किसनगिरी बाबा समाधी मंदिर व भगवान दत्तात्रय मंदिरात दर्शन घेत होते रात्री उशिरा पर्यत भाविकांचा ओघ सुरूच होता देवस्थान च्या वतीने सुलभ दर्शन होण्यासाठी दर्शनबारी लावण्यात आली होती.

Related Stories

No stories found.