माझ्यावर टीका करणार्‍यांनी आत्मपरिक्षण करावे - आ. लहामटे

माझ्यावर टीका करणार्‍यांनी आत्मपरिक्षण करावे - आ. लहामटे

अकोले (प्रतिनिधी) / Akole - मी पळकुटा नाही, मुंबईला महत्वाच्या कामाला गेलो होतो. माझ्या वर टीका करणार्‍यांनी आत्मपरीक्षण करा, कोण आदिवासींच्या बाजूचे अन कोण विरोधी? अगस्ति कारखान्याचे प्रश्‍नाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कडे चर्चा केली असून त्यांनी अगस्ति कारखाना काटकसरीने चालवावा अशी सूचना केली असल्याची माहिती आ. डॉ. किरण लहामटे (MLA Dr. Kiran Lahamate) यांनी पत्रकार परिषदेत दिली. अकोले तालुक्यात लवकरच उप जिल्हा रुग्णालय, देवीच्या घाटाचे काम, ऑक्सिजन प्लॅन्ट व बिताका प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याचे आ. डॉ. लहामटे यांनी सांगितले. (Agasti Sahakari Sakhar Karkhana Ltd.)

यावेळी अमित नाईकवाडी, भागवत शेटे, संतोष नाईकवाडी, संदीप शेणकर, हरिभाऊ फापाळे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. लहामटे म्हणाले, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरासमोर निदर्शने केली, निषेध केला. मी पळकुटा असल्याचे म्हणाले. याबाबत प्रतिक्रिया देताना आ. लहामटे म्हणाले की, मी पळकुटा नाही, मुंबईला महत्वाच्या कामाला गेलो होतो. घुसखोरी बाबत नागपूर व मुंबई येथील अधिवेशनात मी बोललो आहे. यावेळी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, आदिवासी आरक्षण बाबत अजित पवार यांनी कोणत्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, असेही आ. लहामटे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com