शिर्डीत वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांना गुलाबपुष्प

शिर्डीत वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांना गुलाबपुष्प

राहाता न्यायालय विधी सेवा समिती तसेच शहर वाहतूक शाखेची गांधीगिरी

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीतील (Shirdi) नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad Highway) रस्त्यावरून जाणार्‍या येणार्‍या वाहन चालकाने ( Driver) वाहन चालवताना घ्यावयाची काळजी (Care to be taken while driving) व पाळावयाचे नियम याविषयीची जनजागृती (Public awareness) राहाता न्यायालय विधी सेवा समिती (Rahata Court Legal Services Committee) तसेच शिर्डी शहर वाहतूक शाखा (Shirdi City Transport Branch) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली असून वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांना उपस्थितांच्या हस्ते गुलाबपुष्प (Rose) देऊन नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.

गुरुवार दि. 19 रोजी सकाळी शिर्डीतील (Shirdi) छत्रपती शिवाजी महाराज चौकात (Chhatrapati Shivaji Maharaj Chowk) राहाता न्यायालय विधी सेवा समिती आणि शिर्डी वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी शहरात जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी रस्त्यावरून जाणार्‍या येणार्‍या वाहन चालकांनी सीट बेल्ट (Seat belt) न लावणे, विना हेल्मेट (Without a helmet) तर वाहनांना नंबर प्लेटच नसणे (Vehicles do not have number plates), अशा वाहन चालकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे प्रबोधन करत वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन अधिकार्‍यांनी केले.

अध्यक्षस्थानी राहाता दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) आदीती आर. नागोरी यांच्यासह न्यायाधीश डी. ए. डोईफोडे (सह दि. न्या. क स्तर राहाता), न्यायाधीश सरिता विश्वंभर (2 रे सह दि. न्या. क स्तर राहाता), राहाता बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल शेजवळ, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक विकास देवरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे, पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे, पोलीस उपनिरीक्षक गंगलवाड यांच्यासह वकील संघाच्या उपाध्यक्षा अ‍ॅड. सौ. वारुळे, अ‍ॅड. चित्रे, कोर्ट अधीक्षक लोहाटे, विधी सेवा समितीचे समन्वयक बळे यांच्या उपस्थितीत शिबिर पार पडले.

यावेळी लक्ष्मीनगर येथील नागरिक, शिर्डी वाहतूक शाखेचे कर्मचारी, शिर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, अधिकारी तसेच रस्त्यावरून जाणारे येणारे वाहन चालक यांनी शिबिरास उपस्थित राहून आपला सहभाग नोंदविला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com