थोरात कारखान्याच्या सभासदांना स्मार्ट कार्डद्वारे मिळणार माहिती

थोरात कारखान्याच्या सभासदांना स्मार्ट कार्डद्वारे मिळणार माहिती

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

देशातील सहकारासाठी आदर्शवत असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने सभासदांच्या सोयीसाठी व कामकाज सोपे होण्यासाठी त्यांची कारखाना संबंधित माहिती एक क्लिकवर मिळण्यासाठी सर्व सभासदांकरिता स्मार्ट कार्ड बनवले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत या कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, सौ. दुर्गाताई तांबे, उपाध्यक्ष संतोष हासे, इंद्रजीत थोरात, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

सदर स्मार्ट कार्ड हे सभासदत्व असेपर्यंत असणार असून सभासदांना एकदा स्मार्ट कार्ड दिल्यानंतर दरवर्षी नवीन कार्ड घेण्याची आवश्यकता नाही. स्वतःच्या मोबाईल वरती स्मार्ट कार्ड वरील क्यूआर कोड स्कॅन करून स्वतःची ऊस नोंद, ऊस टनेज, ऊस बिल यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर समजू शकणार आहे. आपल्या नावाची घेतलेली साखर व शिल्लक साखर याचा तपशील घरबसल्या मिळू शकणार आहे. कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थिती नोंदवणे कामी सदर स्मार्ट कार्ड महत्त्वाचे ठरणार आहे. एकंदरित स्मार्ट कार्डमुळे सभासदांचा वेळ कष्ट व खर्च वाचण्यास मदत होणार आहे.

तरी सदर कार्ड प्रत्येक सभासदास देण्यात येणार असून सर्व सभासदांनी आपला फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, कारखाना गट कार्यालय येथे जमा करावे, असे आवाहन चेअरमन बाबा ओहोळ व संचालक मंडळाने केले आहे.

यावेळी संचालक चंद्रकांत कडलग, गणपतराव सांगळे, रामदास वाघ, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मिनानाथ वर्पे, इंद्रजीत खेमनर, अभिजीत ढोले, भास्कर आरोटे, भाऊसाहेब शिंदे, संपतराव गोडगे, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, अनिल काळे, माणिक यादव, सौ. मंदाताई वाघ, श्रीमती मीराताई वर्पे, संभाजीराव वाकचौरे, सेक्रेटरी किरण कानवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्मार्ट कार्डवर सभासदांना विविध माहिती देणारा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना हा जिल्ह्यातील पहिला असणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com