'या' कामाबाबत आ. रोहित पवारांनी घेतली आढावा बैठक
सार्वमत

'या' कामाबाबत आ. रोहित पवारांनी घेतली आढावा बैठक

गेली महिन्यापुर्वीही आ.पवार यांनी घेतला होता आढावा

Nilesh Jadhav

कर्जत |वार्ताहर|Karjat

कर्जत तालुक्यातून जाणार्‍या नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 516 (अ) कामासंदर्भात आ. रोहित पवार यांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. गेल्या महिन्यातही बैठक घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या कामास येत असलेल्या अडचणी समजावून घेत त्या सोडवण्याच्या सूचना आ. पवार यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सर्वच अधिकार्‍यांकडून योग्य कार्यवाही करण्यात आली आहे.

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अडचणी आता मार्गी लागल्या आहेत.आता या रस्त्याच्या कामाबाबत असलेल्या सर्व फाईल्स दिल्लीला पाठविण्यात येणार असून त्याची पुर्तता करून लवकरच रस्त्याचा शुभारंभ होणार असल्याचा विश्वास आ. रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

या बैठकीसाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण प्रकल्प संचालक, कर्जत, श्रीगोंदे, नगर विभागाचे उपविभागीय अधिकारी, सहाय्यक संचालक नगर रचना विभागाचे अधिकारी, नगर रचनाकार राजेश पाटील, वीज विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी, सीना व कुकडी प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अनेक अडथळे येत असल्याने रस्त्याच्या कामाबाबत गती मिळत नव्हती.त्यामध्ये भू-संपादन काही गावांच्या पाणीपुरवठा योजनेच्या नलिका या रस्ता कामास अडथळा ठरत होत्या.

गेली महिन्यापूर्वीही आ.पवार यांनी राष्ट्रीय महामार्ग कामाचा आढावा घेत महामार्गाच्या कामात येत असलेल्या अडचणी जाणून घेत त्या अडचणी तात्काळ सोडवून महिनाभराच्या कालावधीत या रस्ता कामास गती देण्याच्या सूचना उपस्थित अधिकार्‍यांना दिल्या होत्या. आता अनेक जिल्ह्यांना जोडणार्‍या नगर - सोलापूर महामार्गाच्या कामामुळे जिल्ह्याच्या वैभवात भर पडणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com