अशी झाली नगर अर्बन बँकेची फसवणूक

तोफखान्यात गुन्हा दाखल
अशी झाली नगर अर्बन बँकेची फसवणूक

अहमदनगर । प्रतिनिधी । Ahmednagar

लेटर हेड, शिक्के व खोट्या सहीचा वापर करत 22 कोटी रूपयांचा बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार करून मुकेश चंद्रकांत कोरडे (रा. नागरे गल्ली, नगर) याने त्याच्या मालकासह नगर अर्बन बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अभिजित नाथा घुले (वय- 39 रा. बुरूडगाव रोड, नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कोरडे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत माहिती अशी की, फिर्यादी अभिजित घुले हे जमिनीचा व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार करून बँकांना देतात. त्यांचे पत्रकार चौकातील कोहिनूर प्लाझा याठिकाणी कार्यालय आहे. त्यांचा सहाय्यक म्हणून मुकेश कोरडे हा काम पाहत होता. घुले यांच्याकडे पुणे येथील नेश निल लेब टेक्नो रियल या कंपनीच्या जमिनीचा व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार करण्याचे काम आले होते. या कंपनी करीता आरोपी कोरडे याने 27 मार्च 2018 रोजी घुले यांच्या लेटर हेड, शिक्के व बनावट सहीचा वापर करून तब्बल 22 कोटी रूपयांचा बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार करून दिला. या रिपोर्टच्या आधारे नगर अर्बन बँकेच्या पुणे येथील शाखेने नेश निल लेब टेक्नो रियल या कंपनीला जास्तीचे कर्जवाटप केले. यामुळे फियादी घुले व नगर अर्बन बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. आरोपी कोरडे याने अशाच प्रकार फिर्यादी यांच्या लेटर हेड, शिक्के व बनावट सहीचा वापर करून इतर बँकांना सुद्धा बनावट रिपोर्ट तयार करून दिल्याचा फिर्यादी यांना संशय आहे. यामुळे त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कोरडे विरोधात भादंवि कलम 408, 465, 467, 468, 479 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घायवट करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com