तीस कोटींचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’

तीस कोटींचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’

ना. उदय सामंत । युवकांच्या रोजगार निर्मितीसाठी ठराव घेणार

अहमदनगर l प्रतिनिधी

युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी तसेच उद्योगधंदे सुरू करण्यासाठी नगर येथे प्रा. शशिकांत गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त तीस कोटी रुपये खर्चाचे सेंटर ऑफ एक्सलन्स इन्स्टिट्यूट शासकीय तंत्रनिकेतनच्या दोन एकर जागेमध्ये उभे करणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 31 मार्च नंतर होणार्‍या पहिल्या एमएसबीटीच्या बैठकीमध्ये याबाबत ठराव घेणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

अहमदनगर येथे युवा सैनिकांचा मेळावा, बैठक तसेच 83 युवा सैनिकांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, सभापती सुरेखा गुंड उपसभापती डॉक्टर दिलीप पवार, प्रवीण कोकाटे, संदीप गुंड, विलास शेडाळे, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, युवा सेना अध्यक्ष प्राविण गोरे, प्रकाश कुलट, व्ही. डि. काळे, योगेश लांडगे, संभाजी भगत, रामदास भोर, शरद झोडगे, गोविद मोकाटे, गुलाब शिंदे यावेळी उपस्थित होते.

यावेळी सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद मोदी यानी शेतकर्‍यांच्या विरोधातील तीनही कायदे मागे घेतले. हे कायदे मागे घेण्यासाठी दोन वर्षांपासून शेतकरी झटत आहेत यासाठी शेतकर्‍ंयाना बलिदानही देण्याची वेळ आली आली. हा केंद्र सरकारचा विजय नसून शेतकर्‍यांचा विजय आहे. नगर तालुक्यात प्राध्यापक शशिकांत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्ष हा वाढलेला आहे. युवा सैनिकांनी आता आक्रमक झाले पाहिजे. पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे.

सर्वच ठिकाणी भगवा फडकणार आहे. सोशल मिडियाच्या पलीकडे जाऊन युवा सेनिकांनी काम केले पाहिजे. गाडे सरामध्ये संघटना वाढवण्याचे कौशल्य आहे. त्याच्याच जोरावर आज 83 गावामध्ये युवा सेनिकांना शाखाप्रमुख पदाच्या नियुक्तीचे पत्र दिले. ज्यांनी सेनेवर टिका केली अशा लोंकाना कोकणवासियांनी मातीमोल करण्याचे काम केले. आज देशातील जनतेला गॅसच्या रकमा कमी करायच्या असेल तर उध्दव ठाकरे यांच्याकडे देशाचे नेतुत्व द्यायला पाहिजे . आठवड्यातून एक दिवस शिवसेनेसाठी, उद्धव ठाकरे यांच्यासाठी दया. ज्या मित्रपक्षाला बोटाला धरून महाराष्ट्रात आणले मोठे केले तेच आता उद्धव ठाकरे यांना खोट पाडण्याचे काम करत आहे.

यावेळी गाडे म्हणाले, गेल्या दोन महिन्यापासून नगर तालुक्यात सत्तर गावामध्ये शिवसेना शाखेच्या फलकाचे अनावरण केले. युवा सेनेच्या शाखेचे नुतनीकरण केले. नगर तालुक्याच्या राजकारणात युवा सैनिकांची फळी बांधायची आहे. जुने शिवसैनिक व युवा सैनिक याची फळी एकत्र आली तर निवडणुक स्वबळावर लढू शकतो. युवा सैनिकांनी शिवसेनेचे विचार केलेले काम घरापर्यत पोहचवण्याचे काम करावयाचे आहे. जो युवा सौनिक चांगले काम करेल त्याला गण प्रमुख, विभागप्रमुख, तालुका प्रमुख सारखे पद देणार आहे .

गाडे सरांवर स्तुतिस्तुमने...

गाडे सरांनी हालअपेष्टा सहन करत पक्ष वाढवला. विरोधकांना नमवले. त्याच्यासाठी उध्दव ठाकरे यांच्याकडे नक्कीच शिफारस करणार. माझा व भाऊ कोरेगावकर यांचा नेहमीच उद्धव सोहबांशी संपर्क असतो. याबाबत आम्ही दोघे चर्चा करणार असल्याचे सांमत यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com