जिल्ह्यात तेरा शेतकरी कंपन्या मार्फत होणार हमीभाव तूर खरेदी

जिल्ह्यात तेरा शेतकरी कंपन्या मार्फत होणार हमीभाव तूर खरेदी

नेवासा | तालुका प्रतिनिधी

2021-22 या वर्षात उत्पादित होणाऱ्या तुरीच्या हमीभाव खरेदीसाठी जिल्ह्यातील 13 शेतकरी कंपन्यांना महा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मार्फत खरेदी केंद्रास मान्यता मिळाली असल्याची माहिती नगर जिल्हा एफपीओ फेडरेशनचे अध्यक्ष प्रा.गंगाधर चिंधे यांनी दिली.

राज्यात हमीभाव खरेदी करण्यासाठी पणन महामंडळ ( मार्केटिंग फेडरेशन ) व महाएफपीसी यांना नाफेड मार्फत मान्यता मिळते. महाएपीसी नोंदणीकृत शेतकरी कंपन्यांमार्फत हमीभाव केंद्रांना मान्यता देतात. यावर्षी महाएफपीसी मार्फत पुढील तेरा कंपन्यांना हमीभाव खरेदी केंद्र मंजूर झाल्याची माहिती महाएफपीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश थोरात यांनी दिली.

या 13 कंपन्यांमध्ये अमरसिंह (बर्गेवाडी ) कर्जत, ग्रीन पॕक (माळवाडगाव) श्रीरामपूर, किसान समृद्धि (भेंडा ) नेवासा, महाअंकुर (कोंभळी) कर्जत, पुण्यस्तंभ (पुणतांबा) राहता, रियल अॕग्रो ( घुटेवाडी) श्रीगोंदा, शेवगाव तालुका (चापडगाव ), वृद्धेश्वर अॕग्रो (ढोरजळगाव), दत्तकृपा (वाघोली) शेवगाव, शुडलेश्वर (गुंडेगाव) नगर, वांबोरी फार्मर्स (वांबोरी) राहुरी, विंचरणा कृषी (नान्नज) जामखेड, वृद्धेश्वर अॕग्रो (ढोरजळगाव) शेवगाव या कंपन्यांचा त्यात समावेश असून सर्वांनी ऑनलाइन नाव नोंदणीस सुरुवात केलेली आहे.

तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तुरीची नोंद असलेला सातबारा, बँकेचे खाते पुस्तक, त्यास जोडलेला मोबाईल नंबर व आधार कार्ड आधी कागदपत्र संबंधित कंपनीकडे येऊन नाव नोंदणी करावी. आॕनलाईन ना नोंदणी झाल्यावर शेतक-यांना मेसेज येईल. चांगल्या दर्जाची तूर शासकीय नियमाच्या अधीन असलेली शेतकऱ्यांनी कंपनीच्या संबंधितांनी सांगितल्यानंतर विक्रीस न्यावी. सर्व शेतकऱ्यांना संबंधित मालाचे पैसे त्यांच्या खात्यावर दहा ते पंधरा दिवसात जमा होतील. त्यासाठी बिनचूक खाते नंबर आयएफएससी कोड सह द्यावा. अजुन इतर काही शेतकरी कंपन्यांनी हमीभाव खरेदी केंद्रासाठी प्रस्ताव दिले असुन त्यांची मान्यता प्रक्रिया चालु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com