कोविडच्या तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेची तयारी सुरू

कोविडच्या तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेची तयारी सुरू

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

करोना संकटात नगरपरिषदेने प्रभावी काम करताना रुग्ण वाढ कमी केली आहे. आगामी तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर संगमनेर नगरपरिषद 100 बेडचे आद्यवत कोविड हास्पिटल उभारणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी दिली.

कोविड साथीची तिसर्‍या लाटेची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेला सामोरे जाण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपरिषद तयारी करीत आहे. सध्या नगरपरिषदेच्या 70 बेडच्या कॉटेज हॉस्पिटल (डि सि एच सी) मध्ये 28 ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. येणार्‍या लाटेचा विचार करता सदर डि सि एच सी रुग्णालयाचा विस्तार करणे आवश्यक वाटत असल्याने बेडची संख्या100पर्यंत वाढवून त्यातील 80 बेडस ऑक्सिजन युक्त करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

परिसरातच एक ऑक्सिजन प्लॅन्टही उभारण्याचा विचार सुरू असून, ऑक्सिजन नेटवर्क व तत्सम यंत्रणा तयार करणे, नवीन बेडस उपलब्ध करणेची तयारी सुरू आहे, नगरपरिषदेचे चालू असलेले नियोजन पाहून यामध्ये आपलेही योगदान असावे असे नगरसेवकांना वाटले व या प्रस्तावित मोठ्या रुग्णालयांसाठी सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी एकत्र येऊन 30 नवीन पद्धतीच्या कॉटस देणगी म्हणून देण्याचे जाहीर केले आहे.

नगरसेवकांच्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत असून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले आहे. तसेच ऑक्सिजन प्लॅन्ट व ऑक्सिजन नेटवर्क, कॉटस, औषधे इत्यादींसाठी औद्योगिक संस्था, बँका, पतसंस्था व आर्थिक संस्थांनी आपल्या सि एस आर फंडातून भरीव मदत करावी, असे आवाहन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर व सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com