संगमनेरात गॅस कटरने ATM मशीन फोडले, १४ लाख रुपये लंपास

संगमनेरात गॅस कटरने ATM मशीन फोडले, १४ लाख रुपये लंपास

संगमनेर | तालुका प्रतिनिधी

गणपती विसर्जन निमित्ताने पोलीस अधिकारी व प्रशासन पोलीस बंदोबस्तात व्यस्त असताना संगमनेरात अज्ञात चोरट्यांनी त्याचा फायदा घेत महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरने फोडून १४ लाख १० हजार रूपयांची रोकड चोरून पोबारा केल्याची घटना शुक्रवार ता.( २९) सप्टेंबर रोजी पहाटे दोन ते चार वाजेच्या दरम्यान घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

संगमनेरात गॅस कटरने ATM मशीन फोडले, १४ लाख रुपये लंपास
माणुसकी ओशाळली! अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मदतीसाठी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत दारोदार फिरली पण...

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संगमनेर शहरातील संगमनेर ते नाशिककडे जाणाऱ्या एका हाॅटेल समोर महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशीन आहे. शुक्रवारी पहाटे दोन ते चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने गॅस कटरने एटीएम मशीन फोडले आणि १४ लाख १० हजार रूपयांची रोकड चोरून पोबारा केला आहे. सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

याप्रकरणी ई.पी.एस कंपनीचे मॅनेजर युगंधर धर्मराज कासार यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव हे करत आहे. यापूर्वीही अज्ञात चोरट्यांनी संगमनेर शहरात विविध बॅकेंचे एटीएम मशीन फोडून लाखो रूपयांची रोकड चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. आता पुन्हा चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून १४ लाख १० हजार रूपयांची रोकड चोरून पसार झाले आहेत यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com