कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) -

पुणतांबा चौफुलीवर दमयंती विजय शिखरे यांच्या बंद दुकानांचे शटर तोडून 03 लाख 75 हजार 410 रुपयांची भिंगरी दारू

अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .

मागील महिन्यात असा एक ट्रकच चोरट्यांनी लंपास केला होता. आता ही एका महिन्यात दुसरी घटना उघडकीस आली असून कोपरगाव शहर पोलिसांचे या घटनेने धाबे दणाणले आहे. त्यामुळे या दारुचोरांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलीसांपुढे उभे ठाकले आहे. शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात फिर्यादी महिला दमयंती शिखरे यांचे कोकमठाण हद्दीत पुणतांबा चौफुलीवर दुकान आहे.

शनिवार दि.13 मार्च रोजी रात्री दहा वाजेनंतर तर आज सकाळी 9.30 वाजेच्या दरम्यान चोरट्याने शटर उचकटून आतील 03 लाख 75 हजार 410 रुपयांचा देशी भिंगरी कंपनीच्या 180 मिलीच्या 173 खोके प्रति खोके किंमत 2 हजार 170 ) लंपास केले आहे. या प्रकरणी दमयंती विजय शिखरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे हे करीत आहेत.