साठवून ठेवलेल्या सोयाबीन वर चोरट्याचा डल्ला!

साठवून ठेवलेल्या सोयाबीन वर चोरट्याचा डल्ला!
सोयाबीन

राहाता | तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील रांजणगाव खुर्द येथील एका शेतकऱ्याच्या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या 21 क्विंटल सोयाबीन अज्ञात चोरट्यानी चोरून नेली. हा प्रकार काल संध्याकाळी घडला.

रांजणगाव येथील दत्तात्रय बबन गाढवे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून राहाता पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील फिर्यादी दत्तात्रय गाढवे यांच्या घरा जवळ पत्र्याच्या शेड मध्ये उघड्या जाळीतून प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने 1 लाख 8 हजार सातशे पन्नास रुपये किमतीची 5000 रुपये दराने 21 क्विंटल 75 किलो वजनाची 29 गोण्या प्रत्येकी 75 किलोच्या पांढऱ्या रंगाचे प्लास्टिक च्या गोण्या चोरून नेल्या. या स्वरूपाच्या फिर्यादी वरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हेड कॉन्स्टेबल डी. आर. कदम हे करत आहेत. सोयाबीन ला भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या सोयाबीन वर भामटे असा डल्ला मारत असल्याने शेतकरी वैतागले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com