केडगाव बायपासवर चोरट्यांचा धुमाकूळ

दोन चालकांना मारहाण करत लुटले
केडगाव बायपासवर चोरट्यांचा धुमाकूळ

अहमदनगर (प्रतिनिधी) -

निंबळक ते केडगाव दरम्यान बायपास रोडवरील उड्डाणपूलावर शुक्रवारी रात्री बारामतीच्या दोन ट्रक चालकांना लुटून

चोरटे पसार झाले. ड्रायव्हरला मारहाण करत चोरट्यांनी साडेसात हजारांचा ऐवज लंपास केला.

असिमपीर बाबालाल मुल्ला (रा. मार्केटयार्ड बारामती) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. मुल्ला यांची (एमएच 04-एफपी 1865) आणि रविंद्र खराडे यांची एमएच 43-वाय 0236) ट्रक केडगाव बायपासवर चोरट्यांनी अडविली. ट्रक उभा राहताच एकाने

काचेवर लोखंडी पाईप मारून दहशत निर्माण केली. इतरांनी मारहाण करत मुल्ला यांचे साचेचार हजार रुपये रोख आणि खराडे यांचे तीन हजार रुपये रोख असा ऐवज लुटून पोबारा केला.

चोरट्यांनी मुल्ला यांचे लायसन, आधारकार्ड आणि जॅकेटही बळजबरीने हिसकावून चोरून नेले. घटनेची माहिती कळताच तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. मुल्ला यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात रस्तालुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com