<p><strong>सलाबतपुर l वार्ताहर </strong></p><p>नेवासा तालुक्यातील सलाबतपूर चोरटयांनी दुकान तसेच दुकान शेजारील घर फोडल्याची घटना घडली आहे.</p>.<p>चोरटयांनी गावातील कापड दुकान फोडून जवळपास दिड लाखाचा माल लंपास केला आहे. तर दुकान शेजारील घरातील सामानाची उचकापाचक करून पाच हजार रुपये चोरून नेले आहे. तसेच तेथील एक मोटारसायकलही चोरून नेल्याची घटना घडली आहे. चोरी झालेल्या सर्व ठिकाणी नेवासा पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. या घटनेचा पोलीस तपास करत असून या घटनेने मात्र गावातील व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे.</p>