दुकान फोडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल लंपास

सावेडी उपनगरातील घटना: तोफखान्यांत गुन्हा
दुकान फोडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल लंपास

अहमदनगर (प्रतिनिधी) - सावेडी उपनगरातील पंचशील हॉटेल शेजारी असलेल्या महावीर सिरँमिक्स बिल्डींग मटेरियल सप्लायर्सचे दुकान फोडून सहा लाख 48 हजार 800 रूपये किंमतीचे प्लंबिंग व बिल्डींगचे सामान चोरून नेले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. दुकानाचे मालक अरविंद अमृतलाल मुथ्या (रा. सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांच्या दुकानाची मागील खिडकी चोरट्यांनी फोडून आत प्रवेश केला. दुकानातील विविध कंपन्याचे गाईड ऑल मिक्सर, गाईड बिब कॉक, पाईप, विद्युत पंप, शॉवरचे साहित्य असा सहा लाख 48 हजार 800 रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. लॉकडाऊनमुळे सर्व आस्थापना बंद आहेत. यामुळे ही चोरीची घटना लवकर लक्षात आली नाही. घटना लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलिसांना माहिती दिली. काल शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, तोफखान्याचे निरीक्षक सुनील गायकवाड, सहायक निरीक्षक किरण सुरसे, रवींद्र पिंगळे, उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांनी घटनास्थळी भेट दिली. डॉगस्कॉड, फिंगरप्रीट पथकाला पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com