अहमदनगर (प्रतिनिधी) -

केडगाव उपनगरातील लिंक रोडवर सुरू असलेल्या बांधकामावरून टाईल्स फरशी चोरणार्या चौघा आरोपींना कोतवाली पोलिसांनी

अटक केली. गणेश चितळे, नवनाथ पवार, प्रशांत दळवी, सागर देठे (सर्व रा. नालेगाव, नगर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

केडगाव उपनगरातील लिंकरोडवरील पोतदार शाळेजवळ विनोद तुकाराम मगर (वय 33 रा. भूषणनगर, केडगाव) यांच्या प्लॅट व गाळ्याचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी त्यांनी टाईल्स फरशी बसविण्यासाठी मोठ्या प्रमाणात फरशी आणून ठेवलेली होती. अज्ञात चोरट्यांनी 3 ऑक्टोबर 2020 ते 1 जानेवारी 2021 या काळात वेळोवेळी मगर यांच्या बांधकामाच्या ठिकाणाहून 49 हजार 300 रूपयांची टाईल्स फरशी चोरून नेली. या प्रकरणी मगर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सदर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व गुप्त खबर्यामार्फत कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आरोपींचा शोध घेतला असता सर्व आरोपी नालेगाव परिसरात राहणारे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रविवारी रात्री सर्व आरोपींना शहरातील अमरधाम परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चोरीबाबत चौकशी केली असता त्यांनी फरशी चोरत असल्याची कबूली दिली.

पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेली फरशी हस्तगत केली आहे. सदरची कामगिरी शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरीक्षक विवेक पवार यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी रवींद्र टकले, विष्णू भागवत, गणेश धोत्रे, कैलास शिरसाठ, नितीन शिंदे, शाहीद शेख, भारत इंगळे, सुमित गवळी, तानाजी पवार, प्रमोद लहारे, सोमनाथ राऊत, सुशिल वाघेला, सुजय हिवाळे यांनी केली.