
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील बोरावके कॉलेजच्या मागील अतिथी कॉलनी भागात चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास नॅनो हौसिंग सोसायटी ते पठाण वस्ती रस्त्यावरील एका वृध्द अध्यापक दांम्पत्याच्या घराच्या आवारात चोरीच्या उद्देशाने शिरुन त्यांचा विद्युत पुरवठा बंद करुन घरात जाण्याचा प्रयत्न झाला. दरवाजा उघडण्याचा आवाज आल्याची चाहूल लागल्याने हे दांम्पत्य जागे झाले. त्यामुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला. त्यानंतर त्यांनी शेजारील कंपाउंडवरुन उड्या मारुन त्यांनी पलायन केले.
शहरात विविध भागात अधूनमधून लहान मोठ्या चोर्या होत आहेत. दोन दिवसांपूर्वी दळवी वस्ती भागातून एक मोटारसायकल चोरीला गेली आहे. चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.