जेव्हा चोरटा म्हणतो, आधी हात सॅनिटाईज करा मगच बदडा

जेव्हा चोरटा म्हणतो, आधी हात सॅनिटाईज करा मगच बदडा

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा शहरात एक वस्ती लगत असलेल्या शेतातील

दोन चंदनाची झाडे भर दिवसा दुपारी बारा एक वाजता चोरीच्या उद्देशाने झाडे कापत असताना या दोन चोरट्यांना आसपासच्या शेतकऱ्यांनी रंगेहाथ पडकले.

आता दिवसा चोर सापडतात म्हंटल्यावर या शेतकऱ्यांनी चोरट्यांना रट्टे द्यायला सुरुवात केली. मात्र तत्पूर्वी यातील एक चोरट्यांनी मारहाण करणाऱ्यांना विनंती केली की आम्हाला मारहाण करा पण आपले हाताला आधी सॅनिटायझर लावून घ्या आता असे म्हंटल्यावर या शेतकऱ्यांनी ही सूचना पाळली आणि हात सॅनिटायझर करून मगच चोरांना बदडले आणि पोलिसांच्या हवाली केले. याबाबत पुणे जिल्ह्यातील दोन चंदन तस्करावर श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com