अट्टल चोर मुद्देमालासह अटक

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
अट्टल चोर मुद्देमालासह अटक

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

शेतकर्‍यांचे मोटारीचे केबल चोरणारे दोन चोरटे एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. त्यांच्याकडून 24 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नगर तालुक्यातील निमगाव घाणा, शिंगवे गावातील शेतकर्‍यांच्या शेतातील मोटारीचे केबल चोरट्यांनी चोरले होते. अंबादास महादेव घुले, रामेश्वर भास्कर घुले (दोन्ही रा. कारखेल ता. आष्टी जि.बीड) या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बाळासाहेब तळुले (वय 45 वर्ष धंदा- शेती रा. निमगाव घाणा) या शेतकर्‍याने एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली होती, 18 सप्टेंबर रोजी रात्री निमगाव घाणा येथील एरिगेशनच्या तलावात टाकलेल्या इलेक्ट्रीक पाण्याच्या मोटरीच्या केबल चोरून नेल्या आहेत.

त्याअनुषंगाने तपास करत असतांना सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना माहिती मिळाली, हा गुन्हा अंबादास व रामेश्वर यांनी केला असून ते कारखेल येथे आहेत. सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन त्यांना कारखेल येथे पाठविले. पोलीस पथकाने सापळा लावून आरोपीना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 24 हजार 800 रुपयांचा चोरीचा माल जप्त केला. अटक केलेल्या आरोपींवर अनेक गुन्हे दाखल आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com