<p>कोपरगाव l तालुका प्रतिनिधी</p><p>गर्द हिरवी झाडी, गोदावरीच्या तीरी असलेल्या कोपरगाव तालुक्यात आज पहाटे सर्वत्र दाट धुके पसरले. </p>.<p>पहाटे आणि संध्याकाळी गारवा वाढत चालला असून धुक्यामुळे वातावरण अल्हाददायक वाटत आहे. जिल्ह्यात सर्वत्र तापमानाचा पारा खाली आला आहे. खर्या अर्थाने आता गुलाबी थंडीला सुरवात झाली आहे. सकाळी व रात्री वातावरण थंड असते. तर अनेक ठिकाणी दाट धुके पडलेले पहायला मिळते. तरी सुध्दा दुपारी उष्मा जणवतो. थंडी आणि उष्म्यामूळे साथीचे (थंडी, ताप व खोकला) आजार वाढत आहेत. त्यामुळे या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डाॅक्टर नागरिकांना देत आहे. धुक्यामुळे वाहतूक धिम्या गतीने होत आहे.</p>