सराईत चोरांच्या मुसक्या आवळल्या

सराईत चोरांच्या मुसक्या आवळल्या

पारनेर | तालुका प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे धारदार हत्याराने जखमी करून चोरी करणारे दोन आरोपी गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

सराईत चोरांच्या मुसक्या आवळल्या
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

विजय जगन्नाथ मोहिते (वय ३८, रा. दरोडी, ता. पारनेर) आणि मनोज रमेश पवार (वय २८, रा. जुन्नर, ता. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी पावणेबाराच्या दरम्यान आरोपी पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसले होते. आरोपींनी घरातील वृद्ध महिलेला बाथरूममध्ये कोंडून जखमी करत ५२ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. यासंदर्भात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

सराईत चोरांच्या मुसक्या आवळल्या
'या' ड्रामा क्वीनची Bigg Boss च्या घरातून एक्झिट

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिल्या होत्या. आरोपींचा शोध सुरू असताना हा गुन्हा आरोपी विजय मोहिते याने केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा लाऊन आरोपी मोहितेला ताब्यात घेतले. मोहितेने त्याचा साथीदार मनोज पवार याच्या सोबतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने मनोज पवार याला देखील ताब्यात घेतले.

सराईत चोरांच्या मुसक्या आवळल्या
Happy Birthday Tamannaah : 'मिल्क ब्युटी' तमन्नाचा आज वाढदिवस, जाणून घ्या तिच्याबद्दल...

आरोपींना पारनेर पोलिस स्टेशनला हजर करण्यात आले असून पुढील तपास पारनेर पोलिस करत आहेत. आरोपींकडून २५ ग्रॅम वजनाचे दागिने आणि दुचाकी असा एक लाख ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, सफौ. राजेंद्र वाघ, सफौ. संजय खंडागळे, पोहेकॉ. बापु फोलाणे, भिम व पोहेकॉ. संभाजी कोतकर यांच्या पथकाने केले .

सराईत चोरांच्या मुसक्या आवळल्या
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

Related Stories

No stories found.