चोरट्यांनी ट्रॅक्टरचे शोरूम फोडले

रोख रक्कमेसह 65 हजारांचा ऐवज लंपास
चोरट्यांनी ट्रॅक्टरचे शोरूम फोडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केडगाव बायपास चौकातील किसान अ‍ॅग्रोटेक या ट्रॅक्टरचे शोरूमचे शटर उचकटून चोरट्यांनी शोरूममधील रोख रक्कम, लॅपटॉप, डीव्हीआर, 8 कोरे चेक असा 65 हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी व्यवस्थापक विश्व सुनील मंडल (वय 35 रा. इंद्र कॉलनी, तारकपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

29 जुलै रोजी रात्री 8 ते 30 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या काळात ही घटना घडली. 30 जुलै रोजी सकाळी वर्कशॉप मॅनेजर सागर शिंदे यांना शोरूमचे मुख्य शटर उचकटलेले व अर्धवट उघडे असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी व्यवस्थापक मंडल यांना कळवले. मंडल यांनी शोरूमचे मालक शैलेंद्र शिवाजी अडसुरे (रा. सावेडी) यांना घटना कळविली. त्यांनी समक्ष जावून पाहणी केली. शोरूमच्या आतील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते.

केबीनमध्ये टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले 50 हजार रूपये व आयसीआयसीय बँकेचे 8 कोरे चेक, डेल कंपनीचा लॅपटॉप, अ‍ॅक्टीव्ह पक्सल कंपनीचा डीव्हीआर असा 65 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com