चोरी करताना तेलंगणांतील तीन महिला शिर्डीत जेरबंद

जेरबंद
जेरबंद

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी (Shirdi) शहरात रामनवमी उत्सवात (Ram Navami Festival) मोठी गर्दी होत असल्याने गर्दीत परराज्यातील चोरटे चोरी (Thieves) करण्यासाठी येत असतात. त्या पार्श्वभूमीवर शिर्डीत मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त असताना 30 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सासवड येथील सुधीर गजानन बोत्रे हे कुटुंबासह साई दर्शनासाठी आले असता मंदिर परिसरातून त्यांचा मोबाईल एकाने लंपास केला होता.

जेरबंद
पाथर्डीच्या युवकाचा नेवासा फाट्यानजिक वाहनाच्या धडकेत मृत्यू

साई मंदिराच्या सुरक्षारक्षकांना माहिती देताच सांगितलेल्या वर्णनाच्या आधारे सुरक्षारक्षकांनी तीन महिलांना पकडून शिर्डी पोलिसांच्या (Shirdi Police) ताब्यात दिले. त्यांच्या अंग झडतीत. 17 हजार 980 रोख व एक घड्याळ व एक 6 हजार किमतीचा मोबाईल असा जवळपास 24 हजाराचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला.

जेरबंद
महसूल पथकावर जीवघेणा हल्ला

शिर्डी पोलिसांत दिलेल्या सुधीर बोत्रे यांच्या फिर्यादीवरून तेलंगणा (Telangana) राज्यातील जी सोमेय्या वय 49, द्वारका सोमेय्या, लक्ष्मीदेवी सोमेय्या वय 20 रा तेलंगणा यांच्या विरोधात भादवी 34, 392 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डी पोलिस करीत आहे.

जेरबंद
नेवाशात प्रवरा पात्रातून वाळू उपसा; चौघांवर गुन्हा दाखल
जेरबंद
महसूल पथकावर जीवघेणा हल्ला
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com