चास येथून दुचाकीची चोरी

चास येथून दुचाकीची चोरी

अहमदनगर (प्रतिनिधी) - घरासमोर लावलेली दुचाकी मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चोरून नेली. नगर तालुक्यातील चास शिवारात ही घटना घडली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

सुर्यभान शंकर गावखरे (वय 63 रा. चास) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी (एमएच 16 बीबी 9726) घरासमोर उभी केली होती. दुपारच्या वेळी दुचाकी चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com