एकाच दिवशी दोन कारची चोरी

नगर शहरातील घटना: तोफखाना, कोतवालीत गुन्हे
एकाच दिवशी दोन कारची चोरी
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत असताना आता चारचाकी वाहने चोरीला जात आहेत. एकाच रात्री दोन कार चोरीला गेल्याप्रकरणी येथील कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

औरंगाबाद रोडवरील दसरेनगरमधून घरासमोर उभी केलेली पाच लाख रूपये किंमतीची कार (एमएच 14 एफएस 1750) चोरीला गेली. मंगळवारी रात्री साडेअकरा ते बुधवारी सकाळी सात वाजताच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मण नाथू माघाडे (रा. दसरेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीची ही कार होती. पुढील तपास पोलीस नाईक वासिमखान पठाण करीत आहेत.

चारचाकी वाहन चोरीला जाण्याची दुसरी घटना केडगावमधील भूषणनगरमध्ये घडली. येथील अनिल बन्सी बारगळ यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत त्यांनी त्यांची कार (एमएच 16 सीव्ही 6060) उभी केली होती. मंगळवारी रात्री 10 ते बुधवारी सकाळी सहा या वेळत अज्ञात चोरट्याने त्यांची कार चोरून नेली असल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.

Related Stories

No stories found.